NCP merger : मोठी बातमी! अजितदादांचे १२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात, राजकारण पुन्हा फिरणार?

image

will NCP factions reunite : अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्या विलीनि‍करणाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहे. पण त्यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे १२ आमदार नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. हे सर्व नेते विलीनीकरणासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यासोबत संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावीत, अशी इच्छा त्या १२ आमदारांनी व्यक्त केली आहे. मुंबईत झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत सुद्धा याबाबत चर्चा झाल्याचे समजतेय. अजितदादांच्या निधनानंतर पक्षात झालेली पोकळी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काम करण्याची या १२ आमदारांची इच्छा असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचे असेल तर शरद पवार यांच्या पक्षाकडून लिखित प्रस्ताव आल्यावर चर्चा केली जाणार असल्याचे समजतेय.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *