NCP Maharashtra News : सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द; निवडणूक आयोगाचा निर्णय

Maharashtra Political : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा  दर्जा रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

यातच सर्वात महत्वाचं म्हणजे तृणमूल आणि आम आदमी पक्षयांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र आता राष्ट्रवादी पक्षाचा हा दर्जा गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती की, राष्ट्रवादी काँग्रेसच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाणार आहे. एकाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा जो दर्जा मिळतो त्या निकषात राष्ट्रवादी पक्ष बसत नव्हता. मात्र दुसरीकडे आम आदमी पक्ष या निकषावर पात्र ठरत होता. 

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्लीत (Delhi) देण्यात आलेलं कार्यलय देखील रिकामं करावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कारण महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त हा एकमेव पक्ष होता, ज्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता. जो आता काढण्यात आला आहे.

एखाद्या पक्षाने 4 वेगवेगळ्या राज्यांतील लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते आणि लोकसभेत किमान 4 जागा मिळवल्या पाहिजेत. कोणत्याही पक्षाला किमान चार किंवा अधिक राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी. हे निकष पूर्ण केल्यानंतरच एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply