NCB च्या मुंबई झोनल डायरेक्टरपदी अमित गवाटे!

मुंबई: एनसीबीच्या मुंबई झोनल डायरेक्टर पदी अमित गवाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमित गवाटे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. समीर वानखेडे मुंबई एनसीबीतून गेल्यानंतर मुंबई झोनल डायरेक्टरचा अतिरिक्त पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे होता. आता या ठिकाणी अमित गवाटे यांची नेमणूक करण्यात आली आहे. NCB चे मुंबई झोनर डायरेक्टरपद मागच्या काही दिवसांत वादाचा विषय ठरला होता. कारण मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवरती पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात चांगलेच युद्ध रंगले होते. नवाब मलिक रोज पत्रकार परिषद घेवून समीर वानखेडेंवरती गंभीर आरोप करत होते. त्यानंतर समीर वानखेडेंना मुंबईच्या झोनल डायरेक्टर पदावरुन पायउतार व्हावं लागले होते. मागच्या काही दिवसांपासून या पदाचा कारभार अतिरीक्त अधिकाऱ्यांकडे होते.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *