Naxal Encounter : मोठी बातमी! १९ नक्षलवाद्यांचा खात्मा, एक कोटीचं बक्षीस असणाऱ्यालाही टिपलं

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये सोमवारी नक्षलवादी आणि जवान यांच्यामध्ये चकमक झाली. यामध्ये १९ नक्षलवादी मारले गेले आहे. सोमवारी सुरू झालेले सर्च ऑपरेशन अद्याप सुरूच आहे. आणखी काही नक्षलवाद्याचे मृतदेह मिळण्याची शक्यता आहे. नक्षलवादी लपून आणि वेळ घेऊन हल्ला करत आहेत, त्यामुळे जवानांना सर्च ऑपरेशन करण्यास वेळ लागत आहे. मृत १९ नक्षलवाद्यांमध्ये मनोज आणि गुड्डू या दोन जहाल नक्षलवाद्यांचा समावेश आहे. मनोज याच्यावर एक कोटी तर गुड्डू याच्यावर २५ लाख रूपयांचं बक्षीस सरकारने ठेवले होतं.

सोमवारी सायंकाळी जवानांनी मैनपूर येथील कुल्हाडी घाटाच्या भालू डिग्गी जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. त्यावंतर जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये अनेकजणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळालेत. मृत झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये सेंट्रल कमेटीचा सदस्य मनोज आणि स्पेशल झोनल कमेटीचा सदस्य गुड्डू यांचा समावेश आहे. दोघांमध्ये सव्वा कोटींचं बक्षीस ठेवण्यात आलेय. मनोज ओडिशा राज्य नक्षलग्रस्तांचा प्रमुखही आहे.

Palghar Crime : रात्रीच्यावेळी वाहने अडवून लुटमार; गावात चोरी करताना अडकले सापळ्यात, चौघेजण पोलिसांच्या ताब्यात

एक कोटी इनाम असणाऱ्या नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमेटीचा सदस्य जयराम उर्फ चलपती यालाही पोलिसांनी ढेर केलेय. मृत झालेल्या नक्षलावद्यांमध्ये महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे, त्यांची ओळख पटवली जात आहे. नक्षलवाद्यांकडून एसएलआर रायफल आणि ऑटोमेटिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे. मोहीम फत्ते झाल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.

सोमवारी झालेल्या चकमकीनंतर सर्च ऑपरेशनसाठी E30, कोबरा 207, सीआरपीएफ 65 आणि 211 बटालियन, एसओजी नुआपाडा यांचे संयुक्त पथक रवाना झाले. आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. आजही सर्च ऑपरेशन सुरूच राहणार आहे. सर्च ऑपरेशन संपल्यानंतर कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply