Navneet Rana : इम्तियाज जलील यांच्या 'त्या' विधानावर खासदार नवनीत राणा भडकल्या; थेट ओपन चॅलेंजच दिलं

Navneet Rana :  अमरावतीत येऊन नवीन राणा यांना लोकसभा निवडणुकीत पाडून दाखवू, असं विधान खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा खासदार नवनवनीत राणा यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तुमच्यासारखे ५६ आले आणि गेले, पण मी घाबरत नाही, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. 

हिंमत असेल तर, माझ्याविरोधात अमरावतीतून निवडणूक लढवावी आणि माझा पराभव करून दाखवावा, असं ओपन चॅलेंज नवनीत राणायांनी जलील यांना दिलं. त्या अमरावतीमधील एका कार्यक्रमात बोलत होत्या. 'या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल', असा पुनरुर्चार देखील राणा यांनी केला.

Rohit Pawar : 'राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 28 असताना...'; मराठा आरक्षणावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

या देशातील लोकांनी अनेक पिढ्यानपिढ्या राम मंदिर उभारण्याची वाट पाहिली. तुमच्यासारखे अनेकजण येऊन गेले. पण अयोध्येत राम मंदिर उभारून दाखवलं, अशी टीकाही नवनीत राणा यांनी खासदार जलील यांच्यावर केली.

ओवेसी यांच्याबद्दल एक शब्द देखील बोलल्यास ते व्याजासह अमरावतीमध्ये आणि तुझ्या घरी येऊन परतफेड करेल, अशा इशारा ओवेसी यांनी दिला होता. या इशाऱ्याचा देखील राणा यांनी खरपूस समाचार घेतला आहे. हिंमत असेल तर अमरावतीत येऊन दाखवा मी साडीचा पदर खोचून उभी आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

तुमच्यात जर हिंमत असेल, तर अमरावतीत येऊन माझ्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवा आणि मला पाडून दाखवा. जर नाही लढवल्यास तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधून कसे निवडून येता हे मी पाहतेच, असं ओपन चॅलेंज देखील नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांना दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply