Navi Mumbai MNS : राज ठाकरेंना मोठा धक्का; नवी मुंबईतील बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

MNS Navi Mumbai : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवी मुंबईत मोठं खिंडार पडलं आहे. पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे नवी मुंबईतील मनसेच्या बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. मनसेचे नवी मुंबई उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी मनसेची साथ सोडत शिवसेनेची (शिंदे गट) वाट धरली आहे.

गेल्या महिन्यापासून प्रसाद घोरपडे पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे नाराज होते. या नाराजीतून त्यांनी दीड महिन्यांपूर्वीच आपल्या उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पदाचा राजीनामा देताना प्रसाद घोरपडे यांनी नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.  

गजनान काळे हे धमकी देत असल्याचा आरोप करत प्रसाद घोरपडे यांनी उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पण त्यांनी पक्ष सोडला नव्हता. पदांचा राजीनामा दिला असला तरी आपण पक्षातच राहून काम करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. मात्र त्यांनी गजानन काळे यांच्यावर केलेल्या आरोपांची कोणतीही दखल पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आली नाही. तसेच पक्षात राहण्यासाठी त्यांची समजूतही काढण्यात आली नाही.

अखेर या नाराजीतून घोरपडे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. प्रसाद घोरपडे यांनी आता शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदेगटाकडून घोरपडे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply