Navi Mumbai Crime : नवी मुंबईतून 11 नायजेरियन व्यक्तींना अटक; 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

Navi Mumbai Crime : नवी मुंबई पोलिसांनी शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर धडक कारवाई केलीये. या कारवाईत 11 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच नायजेरियन व्यक्तींकडून तब्बल 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

एनडीपीएस कायद्या अंतर्गत या 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवी मुंबईतील कोपरीगाव येथे हे नायजेरियन नागरिक राहत होते. येथे राहून ते ड्रग्सची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला.

Pune Crime : सहलीला जाणं पडलं महागात, चोरट्यांनी ४४ लाखांवर मारला डल्ला

यावेळी पोलिसांना तब्बल 16 कोटी रुपयांचे कोकेन आणि एमडी ड्रग्स मिळाले आहेत. अटक केलेल्या नायजेरियन नागरिकांकडे अमली पदार्थांचा साठा कुठून आला? हा साठा ते कुणाला विकत होते? त्यांची पूर्ण साखळी कशी आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply