Navi Mumbai Crime : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून 80 लाखांची फसवणूक, दाेघांना अटक

Navi Mumbai Crime : सीबीआय विभागात पूर्वी तात्पुरत्या स्वरूपात चालक म्हणून कार्यरत असलेल्या एका ठगाने कोल्हापूर मधील आजरा गावात असणाऱ्या वन विभागाच्या पाचशे एकर जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून दोघांकडून तब्बल 80 लाखांची रक्कम घेऊन त्यांना फसवल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुनील धुमाळ याने आपण सीबीआय मध्ये अधिकारी असल्याचे खोटे सांगून प्रसाद घोरपडे आणि त्यांचा सहकारी जैन यांना विश्वासात घेऊन कोल्हापूर मधील आजरा गावात असणारी वनविभागाची जामीन तुमच्या नावे करुन देतो असे सांगत दोघांची फसवणूक केली.

Pune Porsche Car Accident Case : विशाल अग्रवालवर तिसरा गुन्हा दाखल; पुणे गुन्हे शाखेने येरवडा कारागृहातून घेतलं ताब्यात

यासाठी धुमाळ याने वन विभागाचा बनावट ना हरकत प्रमाणपत्र आणि दिंडोशी न्यायालयाची जमिनीसंदर्भात बनावट प्रत दाखवून तब्बल 80 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सुनील धुमाळ विरोधात सीबीडी बेलापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply