Navi Mumbai : बांधकाम व्यावसायिकाकडून 4 लाख रुपयांची लाच घेताना गत सफ्टेंबर महिन्यात रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम याने त्याच्या एकूण उत्पन्नापेक्षा तब्बल 297 टक्के अधिक संपत्ती संपादित केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. त्यानुसार मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश कदम याच्या विरोधात उलवे पोलीस ठाण्यात अपसंपदा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
एनआरआय पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम याला गत सफ्टेंबर महिन्यामध्ये महेश कुंभार या बांधकाम व्यावसायिकाकडून 4 लाख रुपयांची लाच स्विकारताना मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उलवे येथून अटक केली होती. त्यावेळी एसीबीच्या पथकाने उलवे येथील त्याच्या फ्लॅट मधून मोठी रक्कम देखील जप्त केली होती. प्राथमिक तपासात सतीश कदम याने गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचे आढळून आल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहसंचालकाकडून त्याच्या संपत्तीची उघड चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
|
त्यानुसार पोलीस दलात दाखल झाल्यापासून सतीश कदम याने अत्तापर्यंतच्या कालावधीत (1 डिसेंबर 2013 ते 9 ऑक्टोबर 2024) जमवलेल्या संपत्तीची तपासणी एसीबीच्या मुंबई युनिटचे पोलीस निरीक्षक कृष्णा मेखले व त्यांच्या पथकाने तपासणी केली. सहा महिने सुरू असलेल्या या तपासणीत सतीश कदम याने त्याच्या उत्पन्नापेक्षा तब्बल 3 कोटी 48 लाख 40 हजार इतकी (297 टक्के) अपसंपदा केल्याचे आढळून आले आहे.
यावरुन तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम याने नोकरीच्या कालावधीत पदाचा, अधिकाराचा गैरवापर करुन स्वत:च्या आणि कुटुंबाच्या नावावर गैरमार्गाने सदरची संपत्ती कमावल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार एसीबीच्या मुंबई युनिटने सोमवारी उलवे पोलीस ठाण्यात सतीश कदम याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 13(1)(ब) सह 13(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
शहर
- Mumbai : मेहनतीने आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, पण नियतीने घात केला; डोंबिवलीतील क्रू मेंबर रोशनीचा मृत्यू
- Pune : पिंपरी चिंचवडच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू, 'बकरी ईद' कुटुंबियांसोबतचा ठरला अखेरचा सण
- Pune : शादी डॉट कॉमवर ओळख; नंतर लग्नाचे आमिष दाखवत...; पिंपरी चिंचवडमधील महिलेसोबत नको ते घडलं, तिघांना अटक
- Pune : AI आधारित स्मार्ट ई-बस लवकरच ST च्या ताफ्यात दाखल होणार, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
महाराष्ट्र
- Maharashtra Weather : मुंबई-पुण्यात धो धो कोसळणार, १३ जिल्ह्यात अति मुसळधार, वाचा आजचा पावसाचा अंदाज
- Vande Bharat : कोल्हापूरकरांना खुशखबर! मुंबईहून धावणार वंदे भारत, वाचा कधीपासून पटरीवर येणार
- CIDCO Lottery : घराचे स्वप्न पूर्ण होणार! सिडकोची २२ हजार घरांसाठी लॉटरी; वाचा सविस्तर
- Pune : लघुशंकेसाठी गेला, तिघांनी डोक्यावर बिअरच्या बाटल्या फोटल्या, वारज्यात मध्यरात्री गोंधळ
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Air India Emergency Landing : अहमदाबाद अपघाताच्या २४ तासांत एअर इंडियाच्या AI 379 विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग!
- Ahmedabad : विमान दुर्घटनेतील क्रू मेंबर्सची हृदयद्रावक कहाणी; निवृत्त होणारे पायलट अन् नुकतंच रुजू झालेल्या दोघांसह १२ क्रू मेंबर्सचा मृत्यू
- Ahmedabad : अहमदाबाद विमान दुर्घटनेत सुनील तटकरेंच्या नातेवाईक अपर्णा महाडिक अपघातग्रस्त
- Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये भीषण दुर्घटना, २४२ प्रवाशांसह लंडनला जाणारं Air India चं विमान कोसळलं