Navi Mumbai Airport : नव्या वर्षाचं गिफ्ट, रविवारी पहिली लँडिंग होणार, नवी मुंबई विमानतळ ठरलेल्या वेळेतच सुरू होणार

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Navi Mumbai International Airport - NMIA) उद्या (रविवारी) पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार आहे. दुपारी 12 वाजता व्यावसायिक विमानाचे लँडिंग होईल, अशी माहिती मिळाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामे पूर्ण झाली आहे. रन वे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्वाची कामे पूर्ण पूर्ण झाली आहे.

विमानतळाच्या इमारतीचे कामं देखील अंतिम टप्प्यात पोहचले आहे. इतर कामेही वेगात सुरू आहेत. 31 मार्च 2025 ची डेडलाईन चुकणार नसल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी पहिले व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार आहे. महिन्याभरापूर्वी करण्यात आलेली लँडिंग टेस्ट यशस्वी झाल्यानंतर आता व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार आहे. यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Pune : शेडचे काम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू, तिघे जखमी; नऱ्हे भागातील दुर्घटना

रविवारी दुपारी ठीक 12 वाजता इंडिगो एअरलाईनचे व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवे वर लँडिंग करणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची कामे जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असून विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिले विमान उड्डाण करेल असे स्पष्ट करत ही डेडलाईन चुकणार नसल्याची माहिती सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. त्यानुसार महिन्याभरापूर्वीच लष्कराच्या विमानाचे यशस्वी लँडिंग टेस्ट करण्यात आले होते. त्यामुळे आता थेट व्यावसायिक विमानाचे लँडिंग करण्यात येणार असून यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आतरराष्ट्री विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईमध्ये हे विमानतळ तयार करण्यात आलेय. सिडको आणि जीव्हीके (GVK) यांनी एकत्र येत हे विमानतळ बांधले आहे. मुंबईपासून ४० किमी अंतरावर असणाऱ्या पनवेलजवळ हे विमानतळ बांधण्यात आलेय. हे विमानतळ 1,160 हेक्टर क्षेत्रात पसरलेले असून चार टप्प्यात याचं काम होणार आहे. दोन धावपट्ट्या आणि चार टर्मिनल्स असतील. सुरूवातीला या विमानतळावरून वर्षाला दहा लाख प्रवाशी प्रवास करू शकतील, तर १०० टक्के काम झाल्यानंतर ६० लाखांच्या आसपास वर्षाला प्रवाशी प्रवास करतील. नवी मुंबई विमानतळ भारतातील तसेच जगातील प्रमुख शहरांशी जोडले जाईल. मेट्रो, लोकल ट्रेन, बस, आणि खासगी वाहने यांच्याशी नवी मुंबई विमानतळ उत्तम प्रकारे जोडले जाईल. नवी मुंबई मेट्रोच्या मार्गांशी जोडणारा एक विशेष मार्ग प्रस्तावित आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply