Navi Mumbai : सानपाडा डिमार्ट परिसरात गोळीबार, एक जण जखमी; आरोपी बाईकवरून फरार

Navi Mumbai : नवी मुंबई्च्या सानपाडा परिसरात गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाच ते सहा राऊंड गोळबार करून दोन आरोपी फरार झाले आहेत. या गोळीबारात एक जण जखमी झाला असल्याची माहिती आहे. भर दिवसा नवी मुंबईच्या सानपाडा स्टेशन जवळील डी मार्ट परिसरात गोळीबार घडल्यानं, परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकणानंतर सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

नवी मुंबईच्या सानपाडाजवळ डी मार्ट आहे. डी मार्टच्या बाजूलाच आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती आहे. सानपाड्यातील स्टेशननजीकचा रस्ता वर्दळीचा आहे. या रस्त्यावर अनेक लोक ये- जा करीत असतात. भर दिवसा हा गोळीबार घडल्यानंतर नागरीकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गोळीबार करणारे दोन आरोपी होते. गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत.

Vegetable Price: भाजीपाल्याचे दर घसरले, ग्राहकांना दिलासा पण बळीराजा चिंतेत; जाणून घ्या आजचे भाव

सानपाड्या जवळील डी - मार्ट जवळ गोळीबार करणारे दोन्ही आरोपी दुचाकीवरून आले. सानपाड्यातील नजीकच्या परीसरात येऊन आरोपींनी एका व्यक्तीवर गोळीबार केला आहे. जवळपास पाच ते सहा राऊंड आरोपींनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. दोन ते तीन गोळ्या एका व्यक्तीला लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबारानंतर जखमी व्यक्तीला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आरोपींनी केलेल्या ५-६ राऊंड गोळीबारात एका व्यक्तीला दोन ते तीन गोळी लागल्याची शक्यता आहे. जखमी व्यक्तीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक घडलेल्या घटनेनंतर सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आरोपी कुठल्या दिशेनं फरार झाले आहेत, या संदर्भातील सीसीटिव्ही फुटेज पोलीस तपासत आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply