Navi Mumbai : नवी मुंबईत ४० फूट लोखंडी कमान कोसळली, पोलीस प्रशासन मदतीला धावलं

Navi Mumbai : नवी मुंबईतील ऐरोलीमधून मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर ३च्या रस्त्यावरून ठाणे-बेलापूर रस्त्याला जाणाऱ्या मार्गावर पावसामुळे ४० फूट कमान कोसळली आहे. या मार्गावर अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी कमान लावण्यात आली होती. नवी मुंबईतील घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे ऐरोलीत रस्त्यावर अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली लोखंडी कमान कोसळली. ऐरोलीच्या भारत बिजली येथील रेल्वे रुळागत असलेल्या अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली ४० फुटाची लोखंडी कमान कोसळली आहे. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेचे ऐरोली विभाग अधिकारी, वाहतूक पोलीस आणि रबाळे पोलीसांनी धाव घेतली.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, आज उपोषणाचा चौथा दिवस; उपचार घेण्यास दिला नकार

ही कमान रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत आहे. यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. रस्त्यावर कोसळलेली कमान ही हायड्रा मशीनच्या साहाय्याने काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कमान हटवण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत.

 या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. रस्त्यावर कमान कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली. आता या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply