Navi Mumbai : नवी मुंबईत 48 तासांत 6 मुलं बेपत्ता; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

Navi Mumbai : नवी मुंबईत ४८ तासांत सहा अल्पवयीन मुलं बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनी आपल्या मुलांचे अपहरण झाल्याच्या तक्रारी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केल्या आहेत. १२ ते १५ वयोगटातील मुलं अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये घबराट आहे. 

पनवेल, कामोठे, कळंबोली, कोपरखैरणे, रबाळे भागातून अल्पवयीन मुलं बेपत्ता झाले आहेत. त्यानंतर पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. अनेक मुलं अचावक बेपत्ता झाल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पोलिसांच्या मदतीने मुलांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झालं आहे.

Dhule News : अवैधपणे दारूची वाहतूक; ट्रकसह मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी केला हस्तगत

माहितीनुसार, बेपत्ता मुलांपैकी एकाचा शोध लागला आहे. पण, अन्य पाच मुलांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. दोन दिवसांत सहा मुलं बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली असून काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply