Navapur News : नवापूर तालुक्यात कडकडीत बंद; आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी जलद कारवाईची मागणी

Navapur News :  धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आदिवासी महिला मजुरावरील झालेल्या सामूहिक अत्याचाराचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यात उमटत आहेत. या प्रकरणी आज आदिवासी संघटनांची नवापूर तालुका बंदची हाक दिली असून या बंदला शहरी आणि ग्रामीण भागात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. 
 
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे कामावरून घरी परतणाऱ्या आदिवासी महिलेवर मुलांदेखत दोन जणांनी अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या विरोधात आदिवासी संघटना एकवटल्या आहेत. या विरोधात कालच पिंपळनेरमध्ये मोर्चा काढत बंद पुकारण्यात आला होता. यानंतर नवापूर  तालुक्यात देखील आज बंदची हाक दिली असून याला शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर नवापूर शहर आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

ग्रामीण भागातही बंद 

या बंदला नवापूर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून आदिवासी महिलेवर झालेल्या  सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असूनही हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून सदर महिलेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. नवापूर तालुक्यातील नवापूर शहर, चिंचपाडा, खांडबारा, विसरवाडी भागातील व्यवसायिकांनी आपले आस्थापने कडकडीत बंद  ठेवले. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply