Navapur Hill Fire : नवापूर तालुक्यातील माकडदरीच्या डोंगराला आग; दोन दिवसांपासून वणवा पेटलेला

Navapur Hill Fire : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील मोरकरंजा गावाजवळील माकडदरीच्या डोंगराला आग लागल्याचे चित्र आहे. याठिकाणी जंगलात वणवा पेटल्याने दोन दिवासंपासून आग घुमसत असल्याचे चित्र आहे. हा वणवा विझविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

सुरत- नागपुर महामार्गावरील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या अगदी समोरच असलेल्या या जंगलात गेल्या दोन दिवसांपासून पेटत असलेल्या वनव्याने धुराचे लोळ दिसून येत आहे. डोंगरावरील सुकलेले गवत आणि झांडाच्या पालापाचोळ्यामुळे लागलेला वनवा हा चटकण पसरत असल्याचे चित्र आहे. आग पसरत असल्याने डोंगर परिसरातील गावांमध्ये देखील थोडी भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी देखील आजूबाजूच्या परिसरातील गावकरी जागून राहत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Jalgaon News : जळगावमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; 400 कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

आग विझविण्याचे प्रयत्न सुरूचडोंगरातील वनवा विझवण्यासाठी वन मजूर, स्थानिक गावकरी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. मात्र मागील दोन दिवसांपासून लागलेली हो आग विझविणे कठीण जात आहे. दरम्यान अशा पद्धतीने वनवे पेटू नये; यासाठी वनविभागाने उपाययोजा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply