Nashik To Mumbai Long March : महाराष्ट्र राज्य ग्राम विकास रोजगार सेवक आक्रमक, नाशिक ते मुंबई पायी लाँग मार्च

Nashik To Mumbai Long March : महाराष्ट्र राज्य ग्राम विकास रोजगार सेवक संघ यांच्या वतीने नाशिक ते मुंबई असा लॉंग मार्च साेमवारी (ता.15) नाशिक शहरातून काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये हजारो लोक सहभागी झाले असून लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या प्रभावी व योग्य अंमलबजावणीसाठी राज्यांमध्ये काढण्यात येत आहे. योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असली तरी या योजनेची मुळात सुरुवात ही महाराष्ट्र राज्याच्या धरतीवर केली आहे असे असले तरी या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत देशपातळीवर योजनेचा अंमलबजावणी बाबतचा विचार केला असता महाराष्ट्र राज्यांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या कमी खर्च झाल्याने दिसून येत यामध्ये ग्राम पातळीवर काम करणारा ग्रामरोजगार सेवकांकडे मुख्यत दुर्लक्ष झाले आहे.

Maharashtra Politics : अखेर ठरलं! राज्यात भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार? शिंदे अन् अजित पवार गटाला मिळणार 'इतक्या' जागा

ग्राम रोजगार सेवक संघाने याआधी 11 दिवसाचे उपोषण देखील केले आहे मात्र तरी मागण्या मान्य झाल्या नाही प्रलंबित मागण्याचा विचार लवकरात लवकर करावा अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे.

या निवेदनाचा व मागण्याचा योग्य विचार शासनाने करून मागण्या मान्य कराव्या अन्यथा ही आंदोलन उग्र स्वरूपाचे होईल असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघाकडून देण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply