Nashik : नाशिकमध्ये माय-लेकासह मामाचा नदीत बुडून मृत्यू; दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर शोककळा

Nashik : नाशिकच्या नांदगावमधून दुर्दैुवी घटना समोर आली आहे. नाशिकच्या नांदगावमध्ये तिघांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दुर्देवी घटना घडल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माय-लेकरासह मामाचा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बाणगंगा नदीजवळ ही घटना घडली आहे. एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

बाणगंगा नदीजवळ पाण्यात मेंढ्या धुण्यासाठी मुलाला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे मुलगा पाण्यात बुडू लागला. त्यावेळी त्या मुलाची आई आणि मामा त्यास वाचवण्यासाठी गेले. त्यावेळी दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत अंबादास केरुबा खरात (वय २९ ), इंदुबाई बापू विटणर ( वय३५ ) आणि वाल्मीक बापू विटणर ( वय १५ ) अशी तिघांची नावे आहेत. तिनही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply