
Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंगरोड उभारणीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पण २५ पैकी १३ गावांमध्ये मोजणीला थेट विरोध सुरू आहे. त्यामुळे या गावांमध्ये अद्यापपर्यंत मोजणीला सुरुवात होऊ शकलेली नाही.
25 गावांमधून जाणार रिंगरोड
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. सन २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा पाचपट अधिक भाविक येतील, या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणांनी नियोजन सुरू केले आहे. भाविकांची गर्दी वाढल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही कोंडी टाळण्यासह भाविकांची व शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता शहरालगतच्या गावांमधून बाह्य रिंगरोड (परिक्रमा मार्ग) निर्माण करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. शहरालगतच्या २५ गावांमधून हा रिंगरोड जाणार असून, तो ६६ किलोमीटरचा असेल.
या रिंगरोडकरिता जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या खासगी जमिनींची आवश्यकता आहे. साधारणत: १ हजार २०० शेतकऱ्यांची ३६५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. २५ टक्के अधिक मोबदला देण्याची तयारी दर्शवित थेट खरेदीने जमिनी घेण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. परंतु, अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची शेतकऱ्यांची धारणा झाली असून, ‘अलाइन्मेंट’ बदलून घरे, विहिरी वाचविण्याची मागणी करीत अनेक गावांमधील भूधारकांनी जमिनी देण्यास विरोध दर्शविला आहे.
या गावांमध्ये विरोध
देवळाली, आडगाव, विंचूरगवळी, बेळगाव ढगा, वडनेर दुमाला, पिंपळगाव बहुला, विहितगाव, मुंगसरे, महादेवपूर, जलालपूर, गोवर्धन या गावांमध्ये मोजणीला अद्याप सुरुवात होऊ शकलेली नाही. मखमलाबाद येथे १२ गटांचे मोजणीचे काम अपूर्ण असून सारूळ आणि राजूर बहुल्यात भूमापनाचा ग्रामपंचायतीचा ठराव जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त होऊ शकलेला नाही. भूमी अभिलेख विभागाची यंत्रणा मोजणीसाठी सज्ज असून, महसूल विभागही लवकरात लवकर मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून भूसंपादनाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे.
नऊ गावांमध्ये मोजणी पूर्ण
नाशिक, दिंडोरीसह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालु्क्यातील गावांमधून हा रिंगरोड जाणार आहे. यासाठी काही गावांमधील शेतकऱ्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले आहे. ढकांबे, मानोरी, वरवंडी, माडसांगवी, पाथर्डी, पिपंळगाव खांब, पंचक, आंबे बहुला आणि गौळाणे येथील संभाव्य बाधित शेतकऱ्यांनी जमीन मोजणीकामी जिल्हा प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले आहे. माडसांगवीतील सर्वाधिक ८७, पाथर्डी गावातील ३३, गौळाणेतील २३, ढकांबे येथील १९, तर पंचक येथील १६ गटांच्या मोजणीचे काम महसूल यंत्रणेने पूर्ण केले आहे. मातोरीमध्ये आज सोमवार (दि. १६) रोजी सकाळपासून मोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

