Nashik Rain : मुसळधार पावसाने नाशिकला झोडपलं, गोदाकाठावरील अनेक मंदिरांना पुराचा वेढा, धडकी भरवणारा VIDEO

 

Nashik Rain : नाशिक जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. गेल्या 48 तासांपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झालंय. गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या मंदिरांना पुराचा वेढा पडलाय. रामकुंड आणि गोदाघाटावरील मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडा असून मंदिरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून गोदाकाठ परिसरात असलेली दुकाने हलवण्यास सुरुवात झाली आहे. गोदावरी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दुसरीकडे सुरगाणा तालुक्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय.

Maharashtra Rain Updates : पुण्यासह, पालघर अन् साताऱ्याला पाऊस झोडपणार, IMD कडून रेड अलर्ट; वाचा कुठं काय परिस्थिती

तालुक्यातील नार, पार, तान, मान आणि अंबिका नद्यांना महापूर आलाय. पुरामुळे अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलाय. तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना धोकादायक पद्धतीनं पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतोय.

मुसळधार पावसाने सीमावर्ती भागातील पिंपळसोंड परिसरात वीज पुरवठा देखील खंडित झालाय. त्यामुळे शनिवारी रात्रीपासून अनेक गावे अंधाराखालीच आहे. गोदावरीची पाणी पातळी वाढल्यास अनेक गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे.

त्यामुळे चांदोरी गावाला प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. आज संपूर्ण जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण ७२ टक्के भरलं आहे. आज दुपारनंतर गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply