
Nashik News : नाशिक शहरातील नामांकित बिल्डर कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्याविरोधात 1 कोटी 20 लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर नाशिक पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 3 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
एकीकडे नाशिकला जिल्ह्यात मोठं मोठ्या बांधकाम कंपन्या असून नाशिकसह पुणे, मुंबईकडून नागरिक नाशिकला स्थायिक होत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये दिवसेंदिवस इमारतींची संख्या वाढत आहे. अशातच नरेश कारडा यांच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. एक कोटी वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. व्यावसायिक राहुल जयप्रकाश लोनावत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डिसेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत अशोका मार्गवरील कारडा कंट्रक्शनच्या गृहनिर्माण प्रकल्प कार्यालयात प्रकल्प विकास कामांसाठी एक कोटी वीस लाख रुपये घेतले होते.
|
|
दरम्यान यानंतर अनेक दिवस उलटूनही ते बांधकाम पूर्ण झाले नाही, तसेच रक्कम देखील लोनावत यांना परत केली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी लोनावत यांनी आठवडाभरापूर्वी तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला होता. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी सखोल चौकशी करून मुंबई नाका पोलीस ठाण्यात कारडा यांच्यासह संशयित व्यवस्थापकीय संचालक मनोहर कारडा, देवेश कारडा, संदीप शहा यांच्याविरुद्धही मुंबई नाका पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पथकाने रात्री उशिरा कार्डा यांना अटक केली असून जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यालयांना पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने 3 नोव्हेंबर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कारडा यांच्याविरुद्ध मंगळवारी दिवसभरात चार ते पाच तक्रारी नव्याने प्राप्त झाल्या आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
नरेश कारडा यांची कारडा कन्स्ट्रक्शन या नावाने बांधकाम फर्म आहे. कारडा कन्स्ट्रकशनच्या माध्यमातून अशोका मार्ग या परिसरात नरेश कारडा यांनी 2019 मध्ये बांधकाम प्रकल्प सुरू केला होता. या बांधकाम प्रकल्पातील दोन गाळ्यांसाठी लुणावत यांना दोन गाळे कारडा देणार होते. त्यासाठी कारडा यांनी फिर्यादीकडून 1 कोटी 20 लाख रुपये घेतले होते. बुकिंग रक्कम घेऊनही बांधकाम प्रकल्पाला सुरुवात होत नसल्याने तक्रारदारांनी कारडा यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र कारडांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंबई नाका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल करून बांधकाम व्यावसायिक व कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांना अटक करण्यात आलीआहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel
