Nashik News : लालपरीच्‍या स्टिअरिंगवर महिला चालक; नाशिक ते सिन्नर मार्गावर चालविली बस

नाशिक : एसटी महामंडळाच्या इतिहासात एक ऐतिहासिक घटना घडली. नाशिक ते सिन्नर या मार्गावर प्रथमच एका महिला चालकाने एसटी महामंडळाची बस चालवली. माधवी साळवे या महिला चालकाने केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे. 

माधवी साळवे या नाशिकमधील पहिल्या एसटी महिला ड्रायव्हर ठरल्या आहेत. नाशिकमधील धुडगाव येथे राहणाऱ्या माधवी यांचा गृहिणी ते बस ड्रायव्हर असा प्रवास कौतुकास्पद आहे. एसटी महामंडळाने सन २०१९ च्या भरती प्रक्रियेत २०६ महिलांची चालक या पदावर निवड केली. या सर्व महिलांना एक वर्ष हेवी व्हेईकल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर या महिलांनी एक वर्ष एसटी बस चालवण्याचा सराव केला. आता या महिलांना एसटी बसवर रीतसर रूजू करून घेण्यात आले आहे.

माधवी यांना लहानपणापासून गाड्या चालवण्याची आवड आहे. एसटी महामंडळात कुणीही महिला नसल्याने एसटीची निवड केल्याचे माधवी सांगतात. जास्तीत जास्त महिलांनी या क्षेत्रात येण्याचे आवाहन त्यांनी केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply