Nashik : भयंकर! पंचवटीत मानवी कवट्या अन् हाडांनी भरलेली गोणी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Nashik : नाशिक शहरात पंचवटी परिसरात एका गोणीत मानवी पाच ते सहा कवट्या आणि हाडे आढळले होते. त्यामुळे पंचवटी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. एरंडवाडी येथील मंदिराच्या परिसरात मानवी हाडांची गोणी आढळली होती. ही मानवी कवट्या आणि हाडे असलेली गोणी पंचवटी  पोलिसांनी ताब्यात घेतली होती.

या कवट्या आणि हाडे अघोरी विद्या करण्यासाठी आणले असल्याचा पोलिसांना संशय होता. भर वस्तीत मानवी कवट्या आढळल्यामुळे चर्चांना उधाण उधाण आले होते. पोलिसांनी मंदिराच्या पुजाऱ्याला आणि इतर नागरिकांना तपासासाठी बोलावून घेत घटनेची चौकशी केली होती. मंदिराच्या परिसरात मानवी प्लास्टिकच्या कवट्या आणि हाडे आढळून आल्याने नेमका हा काय प्रकार आहे? यासाठी पोलीस कसून तपास करत होते.

Purandra Airport : पुरंदर विमानतळाच्या अडचणी संपुष्टात; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

गोणीत असलेल्या मानवी हाडे आणि कवट्या खऱ्या नसल्याने सर्वांनी सोडला सुटकेचा निःश्वास टाकला आहे. पंचवटी पोलिसांनी सखोल तपास करत हे मानवी हाडे आणि कवट्या प्लास्टिकच्या असल्याचं समोर आलं होतं. परंतु यामागील सूत्रधार कोण? हा प्रश्न मात्र गुलदस्तात होता. त्यामुळे पोलिसांकडून तपास सुरू सुरूच होता.

मानवी हाडे आणि कवट्या प्लास्टिकच्याच असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. नाशिकच्या पंचवटी हद्दीत अघोरी विद्या करणाऱ्या भोंदू बाबाला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. या भोंदू बाबाची कसून चौकशी सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. एरंडवाडी येथील मंदिराच्या परिसरात गोणी आढळल्याचं समोर आलं होतं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply