Nashik : मुसळधार पावसाने महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटला; नाशिक शहरासह ८० गावांचा वीज पुरवठा खंडित

Nashik : नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला पावसाचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे वीजनिर्मिती केंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याने नाशिक शहरासह ७० ते ८० गावांमधील वीज पुरवठा मध्यरात्रीपासून खंडित झाला आहे. ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम सुरु आहे. 

नाशिक शहरासह परिसरात रविवारी सायंकाळी पावसाला सुरवात झाली. तर मध्यरात्रीच्या सुमारास  मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटला आहे. वीजनिर्मिती केंद्रातील १३२ केव्ही सबस्टेशनमधील महा पारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याने वीज पुरवठा खंडित झाली आहे. यामुळे नाशिक शहरातील काही भागासह ७० ते ८० गावांचा वीज पुरवठा रात्रीपासून खंडित आहे. 

Vitthal Rukmini Mandir : विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाणी झिरपू लागलं, भाविकांत नाराजी; संस्थानची वॉटरप्रूफिंगची ग्वाही

वीज पुरवठ्यासाठी सबस्टेशनवर अवलंबून असलेल्या नाशिकरोड, जेळरोड, दसक, देवळाली कॅम्प, सामानगावसह ७० ते ८० गावांचा वीजपुरवठा खंडित आहे. संकलनानंतर महापारेषणकडून ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र वीज पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होणार? याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे या भागातील नागरिकांना अंधारात राहावे लागणार आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply