Nashik : सराफा व्यापाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजण्यासाठी लागला १४ तासांचा वेळ

Nashik  : राज्यातील बडे व्यावसायिक आणि सराफा व्यापारी सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आयकर विभागाचे अधिकारी राज्यात ठिकठिकाणी छापेमारी करीत आहेत. या छापेमारीत अनेकांकडे बेहिशीबी मालमत्ता सापडत आहेत.

नाशिकमध्ये शनिवारी आयकर विभागाने अचानक छापेमारी केली. या छापेमारीत एका बड्या सराफा व्यावसायिकाकडे कोट्यवधींचं घबाड आढळून आलं. सराफा व्यावसायिकाने बंगल्यातील फर्निचर तसेच प्लायवूडच्या आत कोट्यवधींची रक्कम लपवून ठेवली होती.

Pune Porsche Accident : चालकाचे अपहरण, गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव.. अल्पवयीन मुलाच्या आजोबाला २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम बाहेर काढली. नोटांचा इतका मोठा ढीग लागला की, पैसे मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल १४ तासांचा कालावधी लागला. तसेच रोकड नेण्यासाठी ७ कार मागवण्यात आल्या होत्या.

या छापेमारीत आयकर विभागाने सराफा व्यापाऱ्याच्या बंगल्यातून एकूण २६ कोटींची रोकड आणि ९० कोटींची बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले. नाशिक, नागपूर आणि जळगावच्या पथकातील ५० अधिकाऱ्यांची एकाच वेळी ही कारवाई केली आहे.

सलग ३० तास सुरू असलेल्या या कारवाईमुळे शहरातील बड्या व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. सराफा व्यावसायिकाकडे कोट्यावधींची रोकड आणि बेहिशोबी मालमत्ता सापडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी कस्टम विभागाने विमानतळावरून सोने तस्करी करणाऱ्या व्यक्तींना अटक केली होती.

यातील काही आरोपींनी जप्त करण्यात आलेले सोने नाशिकमधील व्यापाऱ्यांना विकल्याची कबूली दिली होती. याबाबत ५ सराफा व्यवसायिकांची नावे समोर आली होती. आयकर विभागाने त्यांचा आयटी रिटर्नचा तपशील तपासला असता, उत्पन्नापेक्षा मिळकत अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे या व्यापाऱ्यांवर धाडसत्र सुरू झाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply