Nashik News: मोठी बातमी! समृद्धी महामार्गावरील पूल कोसळला; परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nashik News: नाशिकमधून मोठं वृत्त समोर आलं आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये समृद्धी महामार्गावरील निर्माणाधीन पूल कोसळल्याची घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तरहाळे ते गांगडवाडी दरम्यान हा पूल कोसळला आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये एकच भीती पसरली. 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या इगतपुरीमध्ये समृद्धी महामार्गावरील निर्माणाधीन पूल कोसळला आहे. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तरहाळे ते गांगडवाडी दरम्यानचा हा पूल कोसळला आहे. पुलाचं काम सुरू असताना अचानक कोसळ्याची घटना घडली. निर्माणाधी पूल कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

इगतपुरी तालुक्यातील गावाच्या मुख्य रस्त्यावर असलेला पूल कोसळल्याने काही काळासाठी परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पुलाच्या कामाचं ऑडिट करण्याची स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
 
दरम्यान, समृद्धी महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील घोटी ते सिन्नर भागातील गांगडवाडी पूलाचे काम अद्याप अपूर्णच आहे. मात्र, या पूलाचे काम होण्यापूर्वी कोसळल्याने दर्जाबाबत साशंकता निर्माण केली जात आहे. या पूलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांकडून म्हटलं जात आहे .
 
समृद्धी महामार्ग सर्वाधिक अपघातासाठी चर्चेचा विषय ठरत असतो. या समृद्धी महामार्गावरील अपघातात आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला आहे. समृद्धी महामार्गावरील सिन्नर ते इगतपुरी दरम्यानचा टप्पा महत्वाचा मानला जातो. त्यामुळे याच महामार्गावरील निर्माणाधीन पूल कोसळल्याने परिसरातील नागरिकांसहित राज्यभरातील लोकांमध्ये चर्चा होत आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply