Nashik News: मोदींच्या ताफ्यातील जवान अपघातानंतर बेपत्ता; कुटुंबासह शिर्डीहून परतत असताना अपघात

Nashik News : केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाचा अपघातानंतर बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दुचाकीवरून तोल जाऊन गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडल्यानंतर जवान वाहून गेल्याची माहिती आहे. गणेश गीते असं बेपत्ता जवानाचं नाव असून ते पंतप्रधानांच्या विशेष पथकात तैनात असल्याची माहिती आहे.

पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी गेले असता संतप्त गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. कॅनॉलचं पाणी रात्रीचं का बंद केलं नाही? कॅनॉलचं पाणी रात्रीचं बंद केलं असतं, तर आतापर्यंत जवानाचा शोध लागला असता, असं म्हणत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

गणेश गिते हे पत्नी व मुलांसह शिर्डी येथून घरी परतत असताना चोंढी शिवारात गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी गोदावरी उजव्या कालव्यात पडली. यावेळी जवानासह स्थानिक नागरिकांनी त्यांची पत्नी व मुलांना वाचवले. मात्र गणेश गिते हे पाटाच्या पाण्यात वाहून गेले. 

गणेश गिते हे २४ फेब्रुवारीपासून सुट्टीवर आले होते. गुरुवारी गणेश पत्नी रुपाली, मुलगी कस्तुरी आणि मुलगा अभिराज यांच्यासह शिर्डी येथे दर्शनासाठी बाईकने गेले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply