Nashik Lok Sabha : ठाकरे गटातच बंडखोरी? महायुतीत ठिणग्या; नाशिकचं राजकारण ढवळलं!

Nashik Lok Sabha : लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने आज बुधवारी १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. खासदार संजय राऊत यांनी 'एक्स' सोशल मीडियावर ठाकरे गटाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीत नाशिकमधून राजा वाजे यांना उमेदवारी मिळाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून वाजे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याने बंडखोरीचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. 

ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांचं नाशिक लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापल्यानंतर ते नाराज झाले आहेत. मी लढणार आणि नडणार, असा इशारा विजय करंजकर यांनी दिला. तसेच कंरजकर यांनी बंडखोरीचेही संकेत दिले आहेत. नाशिकमधून राजा वाजे यांना उमेदवारी दिल्याने विजय करंजकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या २ दिवसांत उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं करंकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Palghar Crime News : प्रेयसीची हत्या करणाऱ्या युवकास पश्चिम बंगालमधून अटक, डहाणू पोलिसांची कारवाई

नाशिकमधून राजा वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय करंजकर यांनी सांगितलं की,'मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लढण्यास सांगितलं होतं. पक्षात घातकी निर्णय घेतले जात आहेत, हे पक्षासाठी चांगले नाही. विजय करंजकर बंडखोरीच्या तयारीत असल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे'. गेल्या दोन टर्ममध्ये विजय करंजकर यांचं तिकीट कापण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply