Nashik HAL : दिवाळी गिफ्ट! नाशिकच्या एचएएल प्रकल्पात प्रवासी विमानांची दुरुस्ती, देशातील पहिलाच प्रकल्प

 Nashik HAL : ऐन  दिवाळीत   नाशिकच्या ओझर येथील एचएएल  या विमान सुट्टे भाग तयार करणाऱ्या कंपनीला दिवाळी गिफ्ट  मिळाले आहे. मिग, सुखोईनंतर आता एचएएलला ए 320 विमानांची देखभाल, दुरुस्तीचे काम मिळाले आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमीटेड आणि एअरबस या विमान निर्मिती कंपनीमध्ये नवी दिल्लीत यांसदर्भात करार झाला आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजेच पुढील एक वर्षात चाचणी होणार आहे. 

नवी दिल्ली येथे गुरुवारी या संदर्भात करार करण्यात आला. एचएएलच्या मिग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी आणि एअरबसचे दक्षिण विभागाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रेमी मलर्ड यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून ए 320 विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि अन्य संपूर्ण सुविधा देण्याचा करार करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजेच, पुढील एक वर्षात चाचणी होणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचनालय आणि युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष सेवा सुरू होणार आहे. मिग विमान सुखोईनंतर एअरबसचे काम एचएएलला मिळाल्यानं प्रकल्पाला नवी संजीवनी मिळाली आहे. रोजगार निर्मितीच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. ऐन दिवाळीत एअरबससोबत झालेल्या कराराच्या रूपाने एचएएएलला  दिवाळी गिफ्ट मिळाले आहे.

Dilip Valse Patil : पाटील अन् शरद पवारांच्या भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण; नेमकी कशावर चर्चा झाली? म्हणाले…

 

दरम्यान, लढाऊ विमानांच्या देखभाल दुरुस्तीचं कौशल्य असलेल्या एचएएल प्रकल्पात आता 320 प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असून त्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला चालना मिळणार आहे. या करारानुसार ओझर येथील एचएएल प्रकल्पात खाजगी प्रवासी विमानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून या संदर्भात परवानगी घेऊन नोव्हेंबर 2024 म्हणजेच वर्षभरात पहिले प्रवासी विमान या ठिकाणी दाखल होऊ शकेल. नाशिकमध्ये अनेक वर्षांनी अशा प्रकारचा प्रकल्प आल्याने त्याचे उद्योजकांकडून स्वागत करण्यात येत आहे. 

ऐन दिवाळीत चांगलं गिफ्ट 

दरम्यान ओझर एचएएलमध्ये आजपर्यंत विविध प्रकारच्या विमानांची निर्मिती झाली आहे. येथील कारखान्यात सुमारे तीन हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. विविध प्रकारची यशस्वी विमाने तयार करण्यात एचएएल प्रशासनाचा मोठा हातखंडा आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून एचएएलकडे कामाचा ओघ काहीसा कमी झाला होता. अशातच नवे काम मिळाल्याने कर्मचाऱ्यांना देखील हायसे वाटले असून ऐन दिवाळीत चांगलं काम मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच या कामामुळे उद्योग क्षेत्राला सुद्धा झळाळी मिळणार असून रोजगार निर्मिती देखील वाढणार आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply