Nashik Fire News : घराला आणि गोदामाला भीषण आग; ५० पेक्षा जास्त दुचाकी जळून खाक, जुने नाशिक परिसरातील घटना

Nashik Fire News : जुने नाशिक परिसरात घराला आणि गोदामाला भिषण आग लागली. या आगीमध्ये ५० पेक्षा जास्त दुचाकी जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. ही आगीची घटना सकाळी सात  वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

Kolhapur News : कोल्हापुरात टोळीयुद्धाचा भडका, तरुणावर अंदाधुंद गोळीबार; नागरिक धास्तावले

या आगीचे स्वरूप अतिशय भीषण होते. संपूर्ण परिसरात धुराचे मोठमोठे लोट निघत होते. या आगीमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. संपूर्ण परिसरात धूर पसरला  होता. आग विझविण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. आग नेमकी कशामुळे लागली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत ५० दुचाकींचा जळून कोळसा झाला आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *