
Nashik Drug Case : राज्यभरात एमडी ड्रग्जचं रॅकेट किती खोलवर रुजलंय याची प्रचिती हळूहळू समोर येत आहे. नाशिकचं नव्हे तर पुण्या मुंबईतही ड्रग्जचा व्यापार जोरात सुरु असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. मात्र हे ड्रग्ज रॅकेट चालतात कसे? ड्रग्ज निर्मितीपासून ते ग्राहकापर्यंत पोहचवण्यासाठी एक चैनच काम करत असल्याचे उघडकीस आले आहे. तुमच्या मोबाईलला जसा फक्त तुम्हाला माहित असलेला कोडवर्ड असतो, तसाच काहीसा प्रकार या ड्रग्ज रॅकेटमध्ये असल्याचे समोर आलं आहे.
ललित पाटील प्रकरण त्यानंतर राज्यात अनेक जिल्ह्यात एमडी ड्रग्ज विरोधात होणारी कारवाई आणि त्यावरून रंगलेल्या राजकारणामुळे एमडी ड्रग्ज हा सध्या चर्चेचा सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतो आहे. मात्र या एमडी ड्रग्जचा व्यापार नक्की कसा चालतो हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नाशिक अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने मागील दोन आठवड्यात सात ड्रग्ज पेडलरला अटक केली असून यातील एक आरोपी हा मुंब्राचा आहे तर बाकी नाशिकचेच असून अनेक जण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी ड्रग्ज कुठून आणले? कोणाला विकले? याचा तपास सध्या केला जातो आहे. ललित पाटील, भूषण पाटील तसेच अभिषेक बलकवडे यांच्या हे संपर्कात होते का? या दिशेने देखील पोलीसांचा तपास सुरू आहे.
|
|
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार एमडी ड्रग्जखरेदीपासून ते विक्रीपर्यंत म्हणजेच व्यवहार ठरवणारा, माल विकत घेऊन येणारा, हातात माल देणारा तसेच खरेदीदाराकडून प्रत्यक्षपणे पैसे घेणारा वेगवेगळा असतो, एखाद्या सिनेमात आपण बघतो, त्याचप्रकारे ही एक मोठी साखळीच काम करत असते, अशी चर्चा आहे. हा सर्व व्यवहार रोखीने चालतो, तिथे शक्यतो ऑनलाईन व्यवहार होत नाहीत. ड्रग्ज ज्या ठिकाणी तयार होते, तिथून जर एक ग्रॅम ड्रग्ज 800 रुपयांना खरेदी केले असतील तर प्रत्यक्ष खरेदीदाराकडे पोहोचेपर्यंत त्याची किंमत 1800 ते 2200 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचते. व्यवहार करतांना शक्यतो सांकेतिक भाषेत बोलले जाते, कुठे एमडी ड्रग्जला दवा म्हणतात तर कुठे माल, चीज, म्याव म्याव म्हणून त्याला संबोधले जाते. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे व्यक्ती या व्यवसायात उतरतात आणि अल्पावधीतच भरपूर पैसा कमावतात.
तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात....
ड्रगचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई अडकत चालली आहे. कॉलेजमधील तरुण तरुणीना ड्रग्सच्या जाळ्यात ओढण्यासाठी ड्रग्ज विक्रेते सावज शोधून ड्रग्ज विक्री करत असल्याचे देखील समोर आले आहे. एकीकडे धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये चक्क ड्रग्ज निर्मितीचा कारखानाच उभा होता. या कारखान्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज निर्माण केलं जात होत. नाशिकच्या तरुणाईला ड्रग्जच्या आहारी घालवलं जात होत, शिवाय मुंबई, पुणे आणि राज्यासह देशभरात हे ड्रग्ज पुरवलं जात असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येतो आहे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. त्यामुळे काही वर्षात कुठे कुठे आणि कसं कसं ड्रग्ज जाळ पसरलं असेल याचा पोलीस शोध घेत आहेत, मात्र ही चेन काही साधी नसल्याचे देखील या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

