Nashik Crime : हटकल्याचा राग डोक्यात गेला, तरुणांच्या टोळक्याचा पोलीस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला

Nashik : नाशिकमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर भररस्त्यात चाकूने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पोलिस गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर भरचौकात चाकू हल्ला करण्यात आला. नामदेव सोनावणे असं या पोलिसाचे नाव आहे. रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांना नामदेव सोनावणे यांनी हटकले होते. याचाच राग मनात ठेवून टोकळ्याने त्यांच्यावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात नामदेव सोनावणे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. टोळक्यांनी हल्ला केला असताना सुद्धा नामदेव सोनावणे यांनी हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे चित्र या घटनेवरून दिसून आले.

Chandrapur School Bus Accident : विद्यार्थांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, बसमध्ये होते ६० विद्यार्थी

टोळक्यांनी हल्ला केला असताना सुद्धा नामदेव सोनावणे यांनी हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे चित्र या घटनेवरून दिसून आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply