Nashik Crime : नाशिक हादरले! घरात घुसून १८ वर्षीय तरुणाची हत्या; शेजारी झोपलेल्या भावालाही कळालंही नाही

Nashik Crime : नाशिकमध्ये  धक्कादायक घटना घडली आहे. घरामध्ये झोपलेल्या १८ वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नाशिकच्या गंजमाळ परिसरात ही घटना घडली आहे. भरवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरामध्ये झोपलेल्या तरुणाची घरात घुसून धारदार शास्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना नाशिकच्या गंजमाळमधील पंचशीलनगरमध्ये घडली. पांडू शिंगाडे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पांडू आपल्या मोठ्या भावासोबत घरामध्ये झोपला होता. त्याचवेळी मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच पांडूचा जागीच मृत्यू झाला.
घराजवळ राहणाऱ्या नातेवाईकाचा दहावा करून घरी येऊन पांडू झोपला होता. झोपेत असतानाच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. महत्वाचे म्हणजे पांडूचा मोठा भाऊ त्याच्या शेजारीच झोपला होता. तरी देखील त्याला कळाले नाही. पांडूचा भाऊ दारू पिऊन झोपला होता. सकाळी पांडूची चुलत बहीण घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेचा तपास भद्रकाली पोलिस करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply