Nashik Bus Fire : नाशिकमध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; छत्रपती संभाजीनगरला जाणारी शिवशाही बस जळून खाक

Nashik Bus Fire : नाशिकमधून बसला आग लागल्याचं धक्कादायक वृत्त हाती आली आहे. नाशिकवरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या शिवशाही एसटी बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत शिवशाही बस जळून खाक झाली आहे. नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर ही घटना घडली आहे.

Indapur Gopichand Padalkar : इंदापुरात गोपीचंद पडळकरांवर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक, उपोषणस्थळी नेमकं काय घडलं?

कुठे घडली घटना?

नाशिकमध्ये पुन्हा एकदा बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. नाशिकमध्ये शिवशाही एसटी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. बसला अचानक लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली आहे.

नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर ही बसला आग लागल्याची घटना घडली. निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील टाकळी फाट्याजवळी डोंगराई हॉटेलसमोर शिवशाही बस जळून खाक झाल्याची घटना घडली. 

बसमध्ये होते २५ प्रवासी

नाशिकवरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या शिवशाही एसटी बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. याबसमधील प्रवासी आणि चालक वाहक सुखरूप आहेत. आगीचे कारण जरी अस्पष्ट असले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बसला अचानक आग लागल्यानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply