Nashik Crime : मौजमजेसाठी सोनसाखळी, दुचाकी चोरी; टोळीसह सोनं खरेदी करणारा सराफ व्यावसायिकही ताब्यात

Nashik : मौजमजा करण्यासाठी सोन साखळी आणि दुचाकी चोरी करण्यास सुरवात केली. चोरलेल्या दुचाकी व सोन्याच्या चैन विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून मौज केली जात होती. अशा प्रकारे चोरी करणाऱ्या या टोळीचा नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तसेच या टोळीकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन दिवसात तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आल्या होत्या. यानंतर गंगापूर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत सोन साखळी चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलासंह तिघांचा समावेश आहे.

West Bengal Clashed: बंगालमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; ISF कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की, वाहने पेटवली

नाशिकसह पुण्यातील चोरी उघडकीस

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महागडे मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. दरम्यान पोलिसांनी या टोळीकडून ११ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये नाशिक शहरातील सात तर पुणे जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी आणि दुचाकी चोरी केल्याचे गुन्हा उघडकीस आले आहेत.

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

एकूणच गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढ झाली होती. सोनसाखळी चोरांना पकडण्याचा मोठे आव्हान नाशिक पोलिसांसमोर होते. सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून अजून तपास सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply