Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

Nashik : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कमालीचा उत्साह दाखविल्याने जिल्ह्यात विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ पासून झालेल्या चार निवडणुकांमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक मतदान चालू विधानसभा निवडणुकीत नोंदविण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण १५ विधानसभा मतदारसंघ असून, येथे ५० लाख ६१ हजार मतदार आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर १९६२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक पार पडली.

त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी-जास्त होत राहिली आहे. साधारणतः १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यासह जिल्ह्यात विक्रमी मतदान झाल्याचे राजकीय तज्ज्ञांनी सांगितले. त्यानंतर थेट २०२४ च्या विधानसभेत ६९.१२ टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. २००९ मध्ये जिल्ह्यात मतदारसंघांची संख्या पंधरा झाली. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत चढ-उतार झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

Pune : हडपसरमध्ये चालणार ‘एम’ फॅक्टर ! बंडखोर उमेदवाराच्या मतांंवर विजयाचा कौल

शहरात उदासीनता कायम

नाशिक शहराचे विभाजन होऊन तयार झालेल्या नशिक पूर्व, मध्य व पश्चिम या तिन्ही मतदारसंघांत मतदानाबाबत मतदारांची उदासीनता दिसून येत आहे. तिन्ही ठिकाणी ४५ ते ६० टक्क्यांच्या आतच मतदान झाल्याची नोंद आहे. यावरून शहरातील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येते.
असे झाले मतदान

मतदारसंघ.......२००९.२०१४२०१९....२०२४

नांदगाव.........६३.८०६७.७६५९.९१....७०.७६

मालेगाव मध्य..६२.७४.६७.९७६७.५१....६९.८८

मालेगाव बाह्य..६१.७०६०.२०५९.५६....६७.७५

बागलाण.........५१.३७६३.०२६०.०५.६८.१५

कळवण. ६९.९१.....७२.३८.७२.५५.७८.४३

चांदवड.. .६६.७६.....७२.१९६९.०३.७६.९३

येवला.. .६५.६५.....७०.७४.६७.६९७६.०३
सिन्नर. निफाड.

दिंडोरी.. ६३.९६.७१.५२६५.८७७४.८५ .६९.८०.७३.८३७५.१५७४.१२ .६४.७०.....७४.१९.

नाशिक पूर्व ......५८.५३.५२.५९.. .६९.६६....७८.०५ .५०.९२....५८.६३

नाशिक मध्य....४६.५२ ५१.९२ ४८.६....५७.६८

नाशिक पश्चिम..४९.७४५८.९५५४.४९...५६.७१

देवळाली.........५३.२६.५४.३६५४.८१..६३.३९

इगतपुरी.. ६०.२५६६.३०.६४.३९.७६.३३

एकूण..... ५९.८९.६५.२४.६२.०६.६९.७२



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply