Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरले; मध्यरात्रीच्या सुमारास इसमाची हत्या, एकजण ताब्यात

 

Nashik : नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनत चालला आहे. अगदी किरकोळ कारणावरून हत्या करण्याचे सत्र सुरूच आहे. यातच मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर परिसरात एका इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदरची घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसात तपास करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

नाशिकच्या सातपुर परिसरातील प्रबुद्ध नगरात एका ४५ वर्षीय इसमाचा मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रबुद्ध नगरात परीसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका ४५ वर्षेीय मृतावस्थेत पडलेला होता. मध्यरात्रीच्या अंधारात हा प्रकार कुणाला कळला नाही. मात्र आज दिवस उजाडल्या नंतर येथून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला इसम दिसल्याने घटना उघडकीस आली.

संशयित काही तासात ताब्यात

घटना लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सातपुर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा करत घटनेचा तपास करताना या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याने हत्या का आणि कशासाठी केली? याचा तपास सातपुर पोलिस करत आहे.

आठवडाभरापासून हत्येचे सत्र सुरूच

नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत चालली आहे. यातच वाढत्या खुनाच्या घटनेमुळे नाशिककर देखील भयभीत झाले आहेत. अगदी क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आल्याच्या घटना नाशिक शहरात घडल्या आहेत. मागील आठ दिवसात चार हत्या झाल्याच्या घटना नाशिक शहरात घडल्या आहेत.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply