Narhari Zirwal : 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाची ठाकरे गटाला लागली गडबड, झिरवाळांना निवेदन

Narhari Zirwal : राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांना 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल 79 पानी निवेदन देणार आहे. कोर्टानं जो निर्णय दिला आहे, त्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गट अध्यक्षांकडे करणार आहे. मात्र सध्या विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्रात नसल्यामुळे ठाकरे गटाने आपल्या मागण्यांचं निवेदन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा सत्ता संघर्ष संदर्भातील निर्णय आल्यानंतर शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे तातडीने ठाकरे गटाचे आमदारांनी आज विधान भवन येथे जाऊन हा निर्णय तातडीने घ्यावा,या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडून निवेदन दिले आहे.

अध्यक्ष अनुपस्थित असल्याने विधानसभा उपाध्यक्षनरहरी झिरवाळ यांना हे निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर अध्यक्षांनी या संदर्भात निर्णय घ्यावा अशा मागणीचे पत्र दिल्याचं ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान भवनात हजर झाल्यानंतर लवकरच आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली जाईल,असं सुद्धा ठाकरे गटाच्या आमदारांकडून सांगण्यात आलं आहे.

याबाबत माहिती देताना सुनील प्रभू म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाची प्रत आणि निवेदन आम्ही विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्याकडे दिले आहे. न्यायलायाने जे म्हटलं आहे त्यावर लवकर निर्णय द्या ही विनंती आम्ही केली आहे. जे काही पत्रात सर्वोच्च न्यायालयाने दिलं आहे तेच आम्ही सगळं दिलं आहे.

'लवकरात लवकर निर्णय घेण्याची आम्ही त्यांना विनंती केली आहे. 15 दिवसांनी निर्णय दिला पाहिजे अशी अपेक्षा आहे. जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला तोच आम्ही त्यांना दिला आणि लवकर निर्णय द्यावी ही विनंती केली आहे. सुप्रीम कोर्टने म्हटलं आहे ते बंधनकारक आहे आणि तसं आम्ही काम करू',असंही ते म्हणाले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply