Narendra Modi News : मोदींना शिव्या देणं हाच काँग्रेसचा अजेंडा; विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधान कडाडले

Narendra Modi News : मोदींना शिव्या देणं हाच काँग्रेसचा अजेंडा असून ते विकसित भारताचे नावही घेत नाहीत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला. एखादा पक्ष घराणेशाही राजकारणाच्या दुष्टचक्रात अडकला की हेच घडते, अशी टीकाही मोदींनी केली. ते राजस्थानमधील विकसित भारत कार्यक्रमादरम्यान बोलत होते

सगेसोयरे अधिसूचनेची येत्या 20 तारखेपर्यंत अंमलबजावणी केली जावी अशी मागणी करत, अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे  पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Manoj Jarange On Strike : उपोषण सुरूच राहणार! जरांगे म्हणाले, 'सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होईपर्यंत...'

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 'विकसित भारत-विकसित राजस्थान'कार्यक्रमातून १७ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचे उद्घाटन केले. या प्रकल्पामध्ये रेल्वे, रस्ते, सौर ऊर्जा, पिण्याचे पाणी आणि नैसर्गिक वायू यांसारख्या विकासकामांचा समावेश आहे.

विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी राजस्थानमधील जनतेला ऑनलाइन संबोधित केलं. विकसित भारतासाठी विकसित राजस्थान तयार करणे खूप महत्वाचे आहे. या प्रकल्पांमुळे राजस्थानातील हजारो तरुणांना रोजगार मिळणार असून मी राजस्थानमधील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो, असं मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांना लक्ष करत त्यांच्यावर टीका केली. २०१४ पूर्वी देशभरात मोठमोठे घोटाळे होत होते. ठिकठिकाणी दंगली घडवल्या जात होत्या. तेव्हा आपल्या देशाचे काय होणार, असे अनेकांना वाटत होते. पण आज आपण विकसित भारत, विकसित राजस्थानबद्दल बोलत आहोत, असं म्हणत मोदींनी काँग्रेवर टीका केली.

मोदींना शिव्या देणं हाच काँग्रेसचा अजेंडा असून ते विकासकामांबद्दल बोलत नाहीत. त्यामुळेच आज सगळे काँग्रेस सोडत आहेत. आता काँग्रेसमध्ये एकच कुटुंब दिसत आहे, काँग्रेसला भविष्याचा अंदाज येत नाही आणि भविष्याचा कोणताही रोडमॅप त्यांच्याकडे नाही, असं म्हणत मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसमधील घराणेशाहीवर निशाणा साधला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply