Narendra Bhondekar : बागेश्वर बाबांना 4 वाजेपर्यंत अटक करा, अन्यथा कायदा व्यवस्था बिघडू शकते : आमदार नरेंद्र भोंडेकर

Narendra Bhondekar : भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथे धिरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांचा सत्संग सुरू आहे. यामध्ये बागेश्वर बाबा यांनी मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्यावर टीका केली आहे. टीका करतानाचा त्यांचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता परमात्मा एक मंडळाचे असंख्य सेवक दुखावले गेलेत. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी देखील यावरून बागेश्वर बाबांना अटक करा, असं म्हटलंय.

बागेश्वर बाबांनी केलेल्या टिकेमुळे भंडारा जिल्ह्यातील शेकडो सेवकांनी रात्री मोहाडी पोलीस स्टेशन गाठत धिरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. तर 16 तास उलटुन देखील पोलिसांनी यावर कुठलीही कारवाही केली नाहीये.

Dhule NCP : अजित पवारांच्या पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांचा गोंधळ

काय म्हणाले होते बागेश्वर बाबा

तुम्हारे पूर्वज नर्क मे है तुम्हे भी नर्क मिलेंगा, असा उल्लेख बागेश्वर बाबांनी आपल्या वक्तव्यात केला आहे. त्यामुळे सर्वजण आक्रमक झालेत. धिरेंद्र शास्त्री यांना चार वाजेपर्यंत अटक करावी अन्यथा मोहाडी येथे येऊन त्यांना धडा शिकवणार असा इशारा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *