Narendra Bhondekar : आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात

Narendra Bhondekar :  भंडाऱ्याचे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील सावंगा गावाजवळ भोंडेकर यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात ९ जण जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. तर आमदार भोंडेकर सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा अपघात झाला आहे. यवतमाळमधील सावंगा गावाजवळ अपघात झाला. या अपघातात ९ जण जखमी असल्याची माहिती आहे. आमदार भोंडेकर हे त्यांचे स्वीय सहाय्यक संजय शेंगोकार यांच्या वडिलांच्या निधन झाल्याने त्यांना भेटायला आले होते.

Political News : उद्धव ठाकरेंना बीडमध्ये मोठा धक्का, सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप यांच्यासह ३५ सरपंच शिंदे गटाकडे; कशामुळं होती नाराजी?

कारचा टायर फुटल्याने अपघात

पोलीसाच्या वाहनाचा दुचाकी आणि रिक्षाची धडक झाली. या अपघात रिक्षातील ७ जण तर दुचाकीवरील २ जण जखमी झाले आहेत. वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ताफ्यातील अपघातात आमदार भोंडेकर सुखरुप आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply