Ramdas Athawale : संविधानाबाबतच्या गैरसमजामुळेच फटका; नारायणगावमधील कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांचे प्रतिपादन

Narayangaon  : "लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये संविधान बदलणार असा मतदारांमध्ये गैरसमज केला गेला. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत हे चित्र दिसणार नाही. विधानसभा निवडणूक भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आर. पी.आय. युती आम्ही एकत्र लढवणार आहोत. विधानसभा निवडणुकीत १८० पेक्षा जास्त जागा मिळून आम्हाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे," असे मत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आठवले म्हणाले, "उपमुख्यमंत्री अजित पवार आमच्या सोबत आल्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत त्याचा आम्हाला फायदा होणार आहे. विधानसभा निवडणुकीत जागा वाटप सलोख्याने व्हावे. अवास्तव मागणी न करता जशी ताकद आहे, तशा जागांची मागणी करावी. आरपीआयला १० ते १२ जागा मिळाव्यात यासाठी माझा आग्रह राहणार आहे.

Sinhagad Ghat : सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसह वाहनांसाठी महत्त्वाची बातमी; वन विभागानं घेतला 'हा' निर्णय, काय आहे जाणून घ्या..

आठवले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाले आहे. ४० ते ५० टक्के मतदान होणे लोकशाहीसाठी घातक आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदान प्रक्रिया सुलभ होणे आवश्यक आहे. मतदारांनी रांगेत जास्त वेळ उभे राहू नये यासाठी विधानसभा निवडणुकीत बूथची संख्या दुप्पट करावी. अशी मागणी निवडणूक आयोगाकडे मी करणार आहे.
भाजपला लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाले नाही. ही वस्तुस्थिती आहे. मात्र एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षे राहणार आहे. सरकार बदलणार या भ्रमात काँग्रेस पक्षाने राहू नये. असे मत केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी व्यक्त केले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply