Narayan Rane : कोण मनोज जरांगे? मी नाही ओखळत, त्यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा

Narayan Rane : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात मराठा- ओबीसी नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसीमधून मराठा बांधवांना आरक्षण मिळावे अशी मागणी केलीय. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाज ओबीसीतून आरक्षण घेणार नाही, असे म्हणत कोण जरांगे पाटील? त्यांना ओळखत नाही असे विधान केले आहे.

केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती व नोंदणी करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे  पुण्यामध्ये आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांच्यावरील प्रश्नावर बोलताना हे विधान केले.

Nashik News : लासलगावमध्ये छगन भुजबळांना दाखवले काळे झेंडे

काय म्हणाले नारायण राणे?

"मराठा समाज ओबीसीमधून आरक्षण घेणार नाही.  जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा ते अजून वयाने लहान आहेत. त्यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा असे जरांगे पाटील म्हणाले. तसेच पुन्हा जरांगे पाटील यांच्यावर प्रश्न विचारला असता जरांगे यांच्यावर प्रश्न विचारला असता, कोण आहे हा? मी नाही ओळखत.." असे नारायण राणे म्हणाले.

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला. "प्रकाश आंबेडकर यांनी राज्यामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचे विधान केले होते. या विधानावर बोलताना नाराय राणे यांनी प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कुणी असो दंगलीविषयी बोलत असतील तर पोलिसांनी त्यांची दखल घ्यायला हवी, त्यांची चौकशी करायला हवी," असे नारायण राणे म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply