Nandurbar News : हमी भावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी; नंदुरबारमधील कापूस उत्पादक शेतकरी संतप्त

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरकारी हमी भावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. मंत्र्यांना दौरे करायला वेळ मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दीडलाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आल. मात्र दुष्काळी परिस्थिती मुळे कापसाच्या उत्पादनांत प्रचंड घट आली आहे. अशा परिस्थितीत कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही निघणार नसल्याची स्थिती आहे.

Lok Sabha 2024 : राज्यात शिवसेना सर्वात मोठा पक्ष, काँग्रेसची शून्यापासून सुरूवात; लोकसभा जागावाटपाआधी राऊतांचा चिमटा

सरकारने कापसाला जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. मंत्र्यांना दौरे करण्यास वेळ आहे. एकमेकांवर टीका करण्यास वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला वेळ नाही.. अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात कापसाला ६३३० ते ७५०० पर्यंत दर मिळत आहे मात्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव व्यापाऱ्यांकडून देण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे आता तरी सरकारने कापुस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपाय योजना केल्यास आत्महत्या वाढण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply