Nandurbar News : बेमुदत उपोषणाला बसलेल्या ६५ वर्षीय गुलाब मराठेंचे प्रकृती खालावली; जरांगे पाटलांना पाठिंबा

Nandurbar News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातील ६५ वर्षीय गुलाब मराठे हे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. 

नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथील गुलाबराव मराठे हे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या गावात आमरण उपोषणाला बसलेआहेत. मराठा आरक्षणासाठी असलेल्या लढ्यात आपण योगदान देत असून पाटील यांचे उपोषणाला पाठिंबा देत मराठे यांनीही बेमुदत उपोषण सुरू केले असून उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वैद्यकीय पथकाच्यावतीने त्यांच्या तब्येतीची तपासणी करण्यात येत असून त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज असल्याचे महत्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

Maratha Reservation : महाराष्ट्र आज जळतोय त्याला एकमेव उद्धव ठाकरे जबाबदार, भाजपची सडकून टीका

गावात जाऊन अनेकांनी दिला पाठिंबा 

तर दुसरीकडे गुलाबराव मराठे यांच्या आंदोलनाला नंदुरबार जिल्ह्यातील मराठा समाजाच्यावतीने मोठा पाठिंबा मिळत असून समाज बांधवांनी उमर्दे गावाला भेटी देत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply