Nandurbar : योग्य भाव मिळत नसल्याने कांदा रेल्वेने जम्मू कश्मीरकडे; खासदार डॉ. गवितांनी काढला तोडगा

नंदूरबार : नंदुरबार, धुळे जिल्हा रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जात असते. मात्र कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. यामुळे दोन्‍ही जिल्‍ह्यातील कांदा हा जम्‍मू– कश्‍मीरच्‍या मार्केटमध्‍ये नेला जात आहे. 

कांदा उत्‍पादक शेतकरीला चांगला भाव मिळत नसल्‍यामुळे खासदार डॉ.हिना गावित यांच्या प्रयत्नाने सोमेश्वर मार्केटची स्थापना करून नंदुरबार, धुळे जिल्ह्याच्या कांदा थेट रेल्वेने जम्मू काश्मीर येथे पाठवण्यात येत आहे. तर शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव देखील बाहेर राज्यात जात असल्याने शेतकऱ्यांना चांगला मोबदला देखील मिळणार आहे.

बांग्‍लादेशातही कांदा निर्यात

नंदुरबार जिल्ह्यातून पहिल्यांदा रेल्वेने दुसऱ्या राज्यात कांदा निर्यात केला जात आहे. तर येणाऱ्या काळात नंदुरबार, धुळे जिल्ह्याच्या कांदा हा बांग्‍लादेश येथे पाठवण्याची देखील व्यवस्था करण्यात येत आहे. नंदुरबार,धुळे जिल्ह्याच्या कांदा दुसऱ्या राज्यात आणि देशात गेल्याने याच्या फायदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांना देखील होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नसल्याच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी सांगितला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply