Nandurbar Crime : चाकू हल्ल्यात महिलेचा मृत्यू; आदिवासी संघटना आक्रमक, नंदुरबार जिल्ह्यात उमटताय पडसाद

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील मलोनी परिसरात घडलेल्या चाकू हल्ल्याने नंदुरबार हादरला असून गांजाच्या नशेत धूर्त असलेल्या रिज्जू कुरेशी नामक व्यक्तीने २३ वर्षीय महिलेवर किरकोळ वादातून चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दिपाली चित्ते या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिपालीचा मृत्यूनंतर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजात तीव्र संतापाची लाट असून त्याचे पडसाद आता संपूर्ण जिल्ह्यात उमटताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निवेदन देण्यात येत आहेत.

शहादा तालुक्यातील लोणखेडा गावात पतीसोबत राहणारी दिपाली चित्ते (वय २३) ही आपल्या आईचं घर असलेल्या मलोनी भागात भेटायला गेली होती. ती घरात आईसोबत असतानाच शेजारी राहणारा रिज्जु मुस्लिम कुरेशी नावाचा व्यक्ती आणि त्याची पत्नी गेल्या काही दिवसांपासून दिपालीची आई आणि तिच्या लहान बहिणीसोबत सतत भांडण करत होते. दरम्यान २९ डिसेंबरला दिपाली आईजवळ असताना शेजऱ्यांसोबत पुन्हा भांडण सुरू झाले. यात गांजाच्या नशेत असलेल्या रिज्जू कुरेशी हा अश्लील भाषेत शिवीगाळ करू लागला.

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

जाब विचारण्यासाठी दिपाली गेली असता कुरेशी याने तिच्यावर चाकू हल्ला केला. या चाकू हल्ल्यात दिपाली गंभीररीत्या जखमी झाली. त्यानंतर तिच्या पतीने तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र शहादा शहरात योग्यरीत्या उपचार न झाल्याने तिला गुजरात राज्यातील सुरत येथे उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दिपालीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

Kolhapur Crime : पळून जाऊन लग्न केलं, मामा संतापला, भाचीच्या लग्नातील जेवणात कालवलं विष

आरोपीना जमीन दिल्याने आदिवासी समाज आक्रमक शहादा पोलिसांत दिपाली चित्ते हिच्या फिर्यादीवरून मुस्लीम हमीद कुरेशी, रिज्जु मुस्लीम कुरेशी, विधी संघर्ष बालिका (सर्व. रा अक्सा पार्क समोर मलोणी ता. शहादा) याच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला होता. मात्र दिपालीला सुरत येथे हलविण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात वाढीव कलम दाखल करत हत्येचा प्रयत्न करून जबर दुखापत केल्याप्रकरणी न्यायालयात जामीन रद्द करण्याचा अर्ज दाखल केला. यावर न्यायालयाने दोन्ही आरोपीचा जामीन रद्द करून पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयाने जामीन दिल्यानंतर या विरोधात आदिवासी संघटनातर्फे मलोणी येथे ४ जानेवारीला आंदोलन केले. उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार, पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते.

आरोपीला कठोर शिक्षेची मागणी दिपाली चित्ते या आदिवासी महीलेच्या मृत्युनंतर आदिवासी समाजात तीव्र संतापाची लाट आहे. घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि म्हसावद या गावात बंदची हाक देण्यात आली होती. अनेक ठिकाणी हल्याच्या निषेधार्थ निवेदने देण्यात आली. या हल्ल्याचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटणार असल्याची स्थिती असून हल्लेखोर रिजू मुस्लिम कुरेशी नामक आरोपीला फाशी देण्याची मागणी मृत महिलेचे पती सागर चित्ते यांनी केली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याच्या इशारा देखील सागर चित्ते यांनी दिला आहे.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply