Nandurbar Corona Update : नंदुरबारमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव; उपचारासाठी पाठविले सुरत

Nandurbar Corona Update :  नंदुरबार शहरासह जिल्ह्यात वर्षभरापासून कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. परंतु राज्यात पसरत असलेल्या कोरोनाच्या नवा व्हेरिएंट जेएन १ चा एक रुग्ण  नंदुरबार शहरात आढळून आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून उपाय योजना करण्यास सुरुवात झाली आहे. 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने राज्यात प्रवेश केला होता. हा व्हेरिएंट झपाट्याने पसरत असताना सावधानीचा इशारा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आला होता. राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा लागण झालेले रुग्ण आढळून आल्यानंतर नंदुरबार शहरात देखील कोरोनाचा रुग्ण आढळल्याने नंदुरबार महापालिकेचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. अनेक महिन्यानंतर कोरोना रुग्ण नंदुरबारमध्ये आढळल्याने प्रशासनाकडून उपाय योजना करण्याला सुरुवात झाली.   

OBC Reservation : 2 हजार गाढवं, डुकरं, मेंढरं घेऊन 20 जानेवारीला मुंबईत धडकणार; ओबीसी नेत्याचा सरकारला इशारा

उपचारासाठी सुरतला रवाना 

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने नंदुरबारमध्ये शिरकाव झाला आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला कुठलाही त्रास नाही. मात्र सदरच्या कोरोना रुग्णाला सुरत येथे उपचारासाठी पाठवण्यात आला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply