Nandurbar Accident News : चांदशैली घाटात पिकअप दरीत कोसळली; अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. नागमोडी वळणाचा आणि तीव्र उताराचा असलेल्या हा चांदसैली घाट असून नागमोडी वळणावरून ३ पलटी खात गाडी खोल दरीत कोसळली. यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन गंभीर जखमी आहेत. 

धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याची जोळणारा आणि कमी अंतराचा मार्ग हा चांदसैली घाट असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवासी वाहतूक होत असते. गेल्या दोन वर्षांपासून या घाटाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. जागोजागी रस्ता खचलेला असून नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. यातच खराब रस्त्यांमुळे हा भीषण अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे.

३ मृतदेह काढले बाहेर

नंदुरबार जिल्‍ह्यातील चांदशैली घाट हा तिव्र उतार व वळणाचा असल्‍याने येथे अनेक अपघात होत असतात. यात उतारामुळे वाहन अनियंत्रीत होवून दरीत कोसळले. यात वाहनात असलेल्या ६ जणांपैकी ३ जणांचा जागीच  मृत्यू  झाला असून एकाची प्रकृतीही गंभीर आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू असून तीन जणांचे मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *