Nanded Police News : शाब्बास नांदेड पोलिस! चाेरीस गेलेले 164 मोबाईल हस्तगत, 70 नागरिकांना केले परत

Nanded Police News : नांदेड पोलिसांच्या विशेष पथकाने चोरीला गेलेले तब्बल 164 मोबाईल हस्तगत केले हाेते. त्यापैकी 70 मोबाईल नागरिकांना पाेलिसांनी नुकतेच परत केले. चाेरीस गेलेला आपला माेबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेह-यावर समाधान हाेते. नागरिकांनी नांदेड पाेलिसांचे आभार मानले.

सार्वजनिक ठिकाणाहून आणि बाजारातून मोबाईल चोरी होण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मोबाईल चोरीला गेला की नागरिक मोबाईल परत मिळेल याची आशाच सोडून देतात.

Lok Sabha Election : विरोधकांनी पैसे दिले तर घ्या, मत मात्र काँग्रेसलाच करा; शिवसेनेच्या माजी आमदाराचा अजब सल्ला

चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने नुकतेच चोरीला गेले तब्बल 164 मोबाईल जप्त केले. पोलिस अधीक्षक कोकाटे यांच्या हस्ते 70 जणांना मोबाईल परत देण्यात आले.

 
 
Image

उर्वरित मोबाईल नागरिकांनी आपले ईएमआय नंबर देऊन न्यावेत असे आवाहन नांदेड पाेलिसांकडून करण्यात आला आहे. दरम्यान मिळालेल्या मोबाईलचे ईएमआय नंबरची यादी फेसबुकवर नांदेड पोलिस आणि ट्विटर वर नांदेड पोलीस या संकेतस्थळी टाकण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply