Nanded News : प्रशासनाला मराठा आंदोलकांची धास्ती; अशोक चव्हानांच्या सभेपूर्वी ४० आंदोलकांना नोटीस देत केले स्थानबद्ध

Nanded News :  मराठा आरक्षणासाठी आंदोलकानी तीव्र स्वरूपात आंदोलने केली होती. या आंदोलकांची धास्ती अजूनही प्रशासनाला असून खासदार अशोक चव्हाण यांची सभा होण्यापूर्वी महादेव पिंपळगाव येथील ४० आंदोलकांना पोलिसांनी नोटीस बजावत स्थानबद्ध केले होते. यानंतर सभा घेण्यात आली.

नांदेडच्या महादेव पिंपळगाव येथे भाजप खासदार अशोक चव्हाण  यांची सभा आज आयोजित करण्यात आली होती. पण त्यापूर्वी अर्धापूर पोलीसांनी गावातील ४० मराठा आंदोलकांना रात्रीच नोटीस देऊन सकाळी पोलीसठाण्यात हजर राहण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार ४० मराठा आंदोलक सकाळी नोटीस घेउन पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना सभा संपेपर्यंत पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. 

Rohit Pawar : अरविंद केजरीवालांसारखी कारवाई माझ्यावरही होईल; रोहित पवारांचा गंभीर आरोप

सभा न घेण्याबाबत दिले होते निवेदन 

मराठा आंदोलकाना स्थानबद्ध करुन अशोक चव्हाण यांची सभा महादेव पिंपळगाव येथे पार पडली. मराठा आंदोलनाच्या संदर्भात महादेव पिंपळगाव येथील आंदोलक सुरुवातीपासूनच आक्रमक आहेत. गावात कोणत्याच पक्षाच्या नेत्याने सभा घेऊ नये; अशा आशयाचे निवेदन देखील मराठा आंदोलकांनी पंधरा दिवसांपूर्वी दिले होते. त्यामूळे अशोक चव्हाण यांच्या सभेदरम्यान मराठा आंदोलक गोंधळ घालतील, या शक्यतेने अर्धापूर पोलीसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली. अशोक चव्हाण यांची सभा संपल्यानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply